नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. सीमा महेश हिरे ह्या निवडणूक जिंकणार तर आहेतच, मात्र त्यांना यावेळी इतर उमेदवारांपेक्षा पन्नास ते साठ हजारांचं मताधिक्य मिळणार, असा ठाम विश्वास सिडकोतील भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे, बाळासाहेब पाटील व अन्य मान्यवरांनी व्यक्त केला.
शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी हिरेंच्या प्रचारार्थ सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये काढण्यात आलेल्या प्रचारफेरीच्या सुरुवातीस मनोगत व्यक्त करताना अनेक मान्यवरांनी वरील प्रमाणे विश्वास व्यक्त केला. सीमा हिरे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपाचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते एकजुटीने मेहनत घेत असून, सौ. हिरेंचे निर्विवाद व्यक्तिमत्व आणि सामान्य नागरिकांसाठी उभं केलेलं काम यामुळे त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता उरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक २९ मधील पवन नगर गणपती मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, लोकमान्य नगर, भगतसिंग चौक, दत्त मंदिर, उत्तम नगर, साईबाबा नगर, एकता चौक, महाकाली चौक, बुद्ध विहार, भगवती चौक, शिवपुरी चौक आदी परिसरातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार सीमा हिरे यांचे क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरोघरी महिला त्यांचे औक्षण करून या प्रचार फेरीत सहभागी होत होत्या.
या प्रचार फेरीत उमेदवार सीमा हिरेंसमवेत मुकेश शहाणे, कैलास अहिरे, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, छाया देवांग, मंदाकिनी जाधव, सोनाली ठाकरे, शेखर निकुंभ, रवी पाटील, प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, पवन कातकाडे, गौरव केदार, योगेश पाटील, प्रदीप चव्हाण, शिवाजी बरके, राजेंद्र जडे, यशवंत नेरकर, डी.बी. राजपूत, प्रमोद सोनवणे, अर्चना दिंडोरकर, छाया परेवाल, प्रकाश भालके, अनिता पाटील, दिलीप देवांग, अर्चना क्षीरसागर, करण शिंदे, आदित्य दोंदे, आर आर पाटील, परमानंद पाटील, प्रवीण सोनवणे, समाधान ढोके, रेखा लिंगायत, जयश्री धारणकर, दिपाली सय्यद, जगदीश काकडे, सुबोध नागपुरे, अंकुश वराडे, रोहित सूर्यवंशी, आनंद आडले, महेश पाटील, अनिकेत कुमावत, बाळा चकोर, ऋषी जगताप, गणेश दराडे, आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या निवासस्थानी सीमा हिरे यांच्या प्रचाराची रणनीती आणि मताधिक्य मिळविण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी प्रशांत जाधव, शशिकांत जाधव, मुकेश शहाणे, दिलीप कुमार भामरे, कैलास अहिरे, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, रवी पाटील, अविनाश पाटील, राहुल गणोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनीही नाशिकमध्ये येऊन सीमा हिरेंसाठी बैठक घेऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा व प्रचारा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी महेश भाई पटेल, गोरख चौधरी, विजय कडाळे, सुनील अहिरे, रवी नाना शेळके आदी उपस्थित होते.