नाशिक : भाजपने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर मविआ कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, आज सायंकाळी महाविकास आघाडीचे नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिमचे उमेदवार ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नाशिक मध्य मधून उबाठाकडून वसंत गिते आणि नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांच्या नावावर शिक्कामोरताब झाल्याचे समजते. लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.