Nashik : 2 हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
Nashik : 2 हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 2 हजारांची लाच घेताना  तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

आसिफ अनिस पठाण (वय 52, तलाठी, सजा- पिंपळस (रामाचे) अतिरिक्त कार्यभार तलाठी सजा- जळगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे जळगाव तालुका निफाड येथे व्यापारी गाळा विकत घेतला आहे. त्याचा फेरफार करून सदर फेरफारची नोंद मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात पठाण यांनी 3000 रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडी अंती 2000/- रुपये लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम  2000 रुपये आज स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध निफाड पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा आदमाने, पो. हवा. पंकज पळशीकर, पो. हवा. प्रमोद चव्हाणके, चालक पो. हवा. संतोष गांगुर्डे यांनी केली.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group