नाशिक शहरातील ३ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय दक्षता पदक घोषित
नाशिक शहरातील ३ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय दक्षता पदक घोषित
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक (अन्वेषण) साठी महाराष्ट्रातील अकरा अधिकाऱ्यांची निवड झाली त्यापैकी तीन अधिकारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत. 

नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग 1- चे नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे संदीप मिटके आणि विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण या तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्र्यांचे दक्षता पदक (अन्वेषण) जाहीर झाले आहे.

हे पदक सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाते. महाराष्ट्रातील उत्कृष्ट अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव गुन्हे अन्वेषण विभागाकडे मागवून गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय व मंत्रालय अशी त्रिस्तरीय पडताळणी होऊन हे प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले जातात.

केंद्रीय गृहमंत्रालयात द्विस्तरीय पडताळणी होऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्या मान्यतेने सदरचे पदक अंतिम केले जातात. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र व वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असलेले पदक हे पदक विजेत्यास प्रदान केले जाते.

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक विजेत्या तीनही अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक व इतर अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group