भाजपचे जिल्हा नेते पंकज शेवाळे यांचा समीर भुजबळ यांना पाठिंबा; असंस्कृत आमदाराबरोबर काम करणार नसल्याचे केले जाहीर
भाजपचे जिल्हा नेते पंकज शेवाळे यांचा समीर भुजबळ यांना पाठिंबा; असंस्कृत आमदाराबरोबर काम करणार नसल्याचे केले जाहीर
img
दैनिक भ्रमर

नांदगाव :- ‘भर सभेत आया बहिणींना शिवीगाळ करणे हे आमदारांना शोभत नाही. अशा असंस्कृत आमदारांबरोबर आपण काम करू शकत नाही. त्यामुळेच अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यंना पाठिंबा देत आहे’, अशी घोषणा भाजपाचे जिल्हा नेते पंकज शेवाळे यांनी झाडी येथे केली. 

शेवाळे पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळेच आम्ही भाजपची संस्कृती शिकलो. सुसंस्कृत माणूस हीच भाजपची ओळख आहे. मी युतीतील घटक पक्षाचा असलो तरी नांदगावमधील आमदाराला व त्याच्या वर्तनाला वारंवार कंटाळलो आहे. विकास कामांच्या बाबतीत नेहमीच आडकाठी आणणाऱ्या आणि असंस्कृतपणा ज्यांच्या ठाई ठाई भरला आहे, अशा आमदारा बरोबर आपण काम करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

शेवाळे पुढे म्हणाले की, धाक, दडपशाही यांना न जुमानता केवळ विकासाचे व्हिजन म्हणून भुजबळ काम करत आहेत. आमदार पंकज भुजबळ यांच्या कालावधीत या भागात मोठी विकास कामे झाली. आताही समीर भुजबळ यांना सर्वत्र पाठिंबा लाभत आहे.

ज्यांच्याकडे संस्कृती नाही अशा असंस्कृत आमदारासोबत का रहायचे, भर सभेत आया-बहिणींना शिवीगाळ करणाऱ्यांना कसे स्वीकारायचे, असे प्रश्न शेवाळे यांनी उपस्थित केले. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रावरील शिट्टी या निशाणी समोरील बटण दाबून भुजबळ यांना प्रचंड मताने विजयी करावे, असे कळकळीचे आवाहन शेवाळे यांनी सर्वांना केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group