नांदगाव (नैवेद्या बिदरी) :- मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलांला वाचवण्यासाठी गेलेल्या आई व मामाचा पाण्याच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना आज (दि. २६) दुपारी तालुक्यातील बाणगाण बुद्रुक येथील घडली. मयतांमध्ये १५ वर्षीय तरुण आणि ३५ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
नांदगाव तालुक्यातील बाणगाव नदी किनारी मेंढ्या चारतांना वाल्मीक बापू इटनर (वय १५) हा मेंढी धुत असताना खोल पाण्यात पडला. त्यास वाचविण्यासाठी त्याची आई इंदूबाई बापू इटनर (वय ३५)यांनी पाण्यात उडी मारली आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असतानात्या पण खोल पाण्यातून पडल्या.
बाहेर पडता येत नसल्याने इंदुबाईने आरडाओरडा केला असतानांच जवळच असलेल्या भाऊ अंबादास केरूबा खरात (वय २९) यांनी खोल पाण्यात उडी घेऊन दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र खोल पाण्यातून बाहेर पडता आले नाही. तिघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.