नाशिक (प्रतिनिधी) :- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते यांनी प्रचाराचा धडाका लावला असून मखमलाबाद गावात प्रचार केल्यानंतर संपूर्ण पंचवटीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीकाठी येऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांसोबत बाईक रॅली काढली.
"काम करणारा माणूस" अशी ओळख असलेल्या गणेशभाऊ यांनी नाशिक शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले. स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात सिटी लिंक बससेवा सुरू करून नाशिककरांना दिलासा दिला.आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण केली. पेठरोडच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला.
कोविड महामारीच्या कठीण काळात, बिटको हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून कार्यान्वित केले.रेमडिसीविरच्या उपलब्धतेसह अल्प दरात पॅथालॉजी लॅबची सुविधा उपलब्ध करून अनेकांना आधार दिला. विकासाची हीच धोरणे पुढे नेत ते उमेदवारी करत आहे. विविध सोसायटी यांच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी गणेश गिते यांना पाठिंबा दिलेला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, मामा राजवाडे, सचिन पिंगळे, दिलीप मोरे, गोकुळ भाऊ काकड, उद्धव पवार, जगदीश गोडसे, संजू बागुल,अजय बागुल, शंभू बागुल, सचिन भाऊ पिंगळे, योगेश पिंगळे, सचिन पिंगळे, नितीन पिंगळे, शिवाजी पिंगळे, दिलीप पिंगळे, मिलिंद मानकर, चिंतामण उगलमुगले, प्रमोद पालवे, गणेश काकड, योगेश काकड, विक्रम काकड, कैलास काकड, नितीन पिंगळे, संजू पिंगळे, नंदू वराडे उपस्थित होते.
हा परिसर काढला पिंजून मखमलाबाद स्टॅन्ड, देवी मंदिर दर्शन व चौकसभा, मारुती मंदिर, कुंभार गल्ली, राजवाडा, कोळीवाडा, पिंगळे गल्ली, मखमलाबाद स्टॅन्ड कार्यालय, मानकर मळा, गामणे मळा, शांतीनगर, स्वामी विवेकानंद नगर, इरिगेशन कॉलनी, रामकृष्ण नगर, गामणे मळा, स्वामी नगर, उदय कॉलनी, मातोश्री नगर, विद्यानगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधलेला.
मखमलाबादला जयंत पाटील यांची सभा
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार गणेशभाऊ गिते यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची संध्याकाळी साडेपाच वाजता मराठा मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.