भाजपाची दुसरी यादी जाहीर; नाशिक मध्यमधून
भाजपाची दुसरी यादी जाहीर; नाशिक मध्यमधून "यांना" मिळाली उमेदवारी
img
दैनिक भ्रमर
 भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २२ उमेदवरांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपनं सर्वप्रथम विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये भाजपनं 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जतमधून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

अनेक दिवसांपासून नाशिक मध्य ची उमेदवारी कोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर नाशिक मध्य ची उमेदवारी विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना जाहीर झाली आहे. 


दुसऱ्या यादीत जाहीर झालेले उमेदवार :

राम भदाणे- धुळे ग्रामीण

चैनसुख संचेती – मलकापूर

प्रकाश भारसाखळे – अकोट

विजय अग्रवाल – अकोला पश्चिम

श्याम खोडे – वाशिम

केवलराम काळे – मेळघाट

मिलिंद नरोटे – गडचिरोली

देवराम भोंगले – राजुरा

कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी

करण देवताळे – वरोरा

देवयानी फरांदे – नाशिक मध्य

हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

कुमार आयलानी – उल्हासनगर

रवींद्र पाटील – पेण

भीमराव तापकीर – खडकवासला

सुनील कांबळे – पुणे छावणी

हेमंत रासने – कस्बापेठ

रमेश कराड – लातूर ग्रामीण

देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य

समाधान आवताडे – पंढरपूर

सत्यजित देशमुख – शिराळा

गोपीचंद पडळकर – जत
इतर बातम्या
Join Whatsapp Group