छगन भुजबळांची विकासकामे एका दमात सांगून दाखवा किंवा एका पानात लिहून दाखवा; अंबादास बनकर यांचे खुले आव्हान
छगन भुजबळांची विकासकामे एका दमात सांगून दाखवा किंवा एका पानात लिहून दाखवा; अंबादास बनकर यांचे खुले आव्हान
img
दैनिक भ्रमर

येवला :– राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी मतदारसंघात गेल्या २० वर्षामध्ये अफाट विकास कामे केली आहेत. ही कामे एका दमात सांगून दाखवा किंवा एका पानात लिहून दाखवा, असे खुले आव्हान ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी दिले. 

बनकर पुढे म्हणाले की, छगन भुजबळ हे खऱ्या अर्थाने येवल्याचे कैवारी आहेत. त्यांनी सुरू केलेली ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही देशभरात नावाजली आहे. सध्या राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजना, धुळगावसह १७ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून दोन महिन्यात या योजना पूर्ण होऊन येवला तालुक्यातील प्रत्येक गावाला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सद्यस्थितीत १००हून अधिक गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने महिलांची पायपीट थांबली आहे. भुजबळ यांनी तालुक्याला जलसमृद्ध केले आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. 

येवला तालुक्यातील विकास कामांबाबत बनकर म्हणाले की, शिवसृष्टी, मुक्तीभूमी, मांजरपाडा प्रकल्प,पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण, मुस्लिम बांधवांसाठी भव्य शादीखाना, विणकर बांधवांसाठी विशेष नोंदणी मोहिम, पैठणी क्लस्टर, प्रशासकीय संकुल, रस्ते आदींसह हजारो कोटी रुपयांची कामे भुजबळ यांनी मंजूर केली आणि ती प्रत्यक्षात झाली सुद्धा आहेत. मांजरपाडा प्रकल्पात तब्बल ९ किलोमीटर लांबीचा बोगदाच साकारला आहे. हे बोलणे सोपे आहे पण करणे अवघड आहे. मात्र, भुजबळ यांनी ते करुन दाखविल्याचे बनकर यांनी स्पष्ट केले.

बनकर पुढे म्हणाले की, तालुक्यातील १ लाख १० हजार महिलांना लाडक्या बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे. तर, २०२३ या वर्षाच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना तब्बल १४६ कोटी रुपये मिळाले आहेत, ही बाब वाटते तेवढी सोपी नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

दरम्यान, भुजबळ यांना लाखाच्या मताधिक्क्याने निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. ती आता आपण पार पाडावी. येत्या २० तारखेला घड्याळ चिन्हाचे बटण दाबावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group