टवाळखोरांची पोलीस उपनिरीक्षकास मारहाण
टवाळखोरांची पोलीस उपनिरीक्षकास मारहाण
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर वृत्तसेवा) :- राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शहरात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पंचवटी परिसरात टवाळखोरांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की,  पंचवटी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाणे यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. नेमाणे हे कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी काही टवाळखोरांना हटकले. यामुळे टवाळखोरांना त्यांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी प्रकाश नेमाणे यांना दगडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात नेमाणे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा आता राज्यभरात सुरु झाली आहे. टवाळखोरांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group