घोटी टोल नाक्यावर ठेकेदाराला वसुली करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मनाई
घोटी टोल नाक्यावर ठेकेदाराला वसुली करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मनाई
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल नाक्याची वसुली आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार असून ठेकेदाराची वसुली बंद करण्यात आली आहे. याबाबतचा एक विशेष आदेश भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या वतीने काढण्यात आला आहे. ही वसुली उद्या दि. 20 पासून 95 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.

नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयी मागील काही दिवसापासून सातत्याने तक्रारी होत होत्या. याचा परिणाम मुंबई नाशिक या दोन शहरांच्या जनजीवनावर झालेला होता. त्यामुळे मुंबईहून नाशिकला येणाऱ्या सर्व गाड्या आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या या कमीत कमी सहा ते आठ तासाचा कालावधी घेत होते. याविषयी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि यामुळे नाशिकचे नाव हे जगाच्या पाठीवर पोहोचण्यापेक्षा अतिशय खराब होत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. 

याबाबत नाशिक सह राज्यातील वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडून तसेच काही अन्य मान्यवरांकडून भारतीय राष्ट्रीय राज्य प्राधिकरणाला निवेदन सादर करण्यात आले होते. काही राजकीय पक्षांनी ऑगस्ट सप्टेंबर च्या कालावधीमध्ये आंदोलन देखील केली होती. 

या सर्व प्रकरणाची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या वतीने एक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून त्यामध्ये म्हटले आहे की 20 ऑक्टोबर पासून म्हणजेच उद्यापासून या महामार्गाची टोल वसुली ज्या ठेकेदाराकडे देण्यात आलेली होती ती 95 दिवसांकारिता बंद करण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही वसुली करणार आहे आणि त्यासाठी मुख्य कारण जे देण्यात आलेला आहे ते म्हणजे या महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्याला जबाबदार असणारे ठेकेदार.
इतर बातम्या
Join Whatsapp Group