रुद्र मेणेचे तडाखेबंद नाबाद त्रिशतक
रुद्र मेणेचे तडाखेबंद नाबाद त्रिशतक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (प्रतिनिधी)- नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित १४ वर्षांखालील मान्सून लीग २०२४-२५ क्रिकेट स्पर्धा रंगत असून एम सी सी संघाकडून खेळताना रुद्र मेणेने तडाखेबंद नाबाद त्रिशतक झळकवले. 

महात्मा नगर १ क्रिकेट मैदानावर पिंगळे क्रिकेट अकादमी विरुद्ध सलामीला येत रुद्र मेणेने केवळ १७४ चेंडूत नाबाद ३०१ धावा फटकावल्या. यात ४६ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. या फलंदाजीच्या जोरावर एम सी सी ने ५ बाद ५२५ असा धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर पिंगळे क्रिकेट अकादमीला ४१ धावांत सर्वबाद करत ४८४ धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला.

नाशिकच्या मान्सून लीगमध्ये एक दिवसीय क्रिकेट खेळताना त्रिशतक झळकवणारा रुद्र हा एकमेव खेळाडू असल्याचे सांगण्यात येते. मागील आठवड्यात झालेल्या 14 वर्षे खालील आमंत्रित त्यांच्या स्पर्धेतील साखळी सामन्यात रुद्र आणि अष्टपैलू कामगिरी करत अर्धशतक व सात बळी घेतले होते.
 एम सी सी संघाकडून इशान कार्लेकरने ४, संग्राम मोराडेने ३ व तनिष पवारने २ गडी बाद केले.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Join Whatsapp Group