नाशिक मध्य मध्ये डॉ. हेमलता पाटील यांनी माघारीबाबत घेतला
नाशिक मध्य मध्ये डॉ. हेमलता पाटील यांनी माघारीबाबत घेतला "हा" निर्णय
img
Mukund Baviskar
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ . हेमलता पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाऊन ठाण मांडल्याने अखेर शेवटचे १५ मिनिटे शिल्लक असताना त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले.

त्याबद्दल मध्य मतदारसंघ कक्षात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. महा विकास आघाडीतील बंडखोरांना माघार घेण्यासाठी संबंधीत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांनी संयुक्त मोहीम राबवून बंडखोरांना माघार घेण्यासाठी परिश्रम घेतले .

डॉ पाटील या उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गेल्या असताना बाहेर त्यांची वाट बघत शिवसेनेचे उमेदवार वसंत गीते सुनील भाऊ आणि अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

दरम्यान नाशिक पश्चिम मधून डॉ . डि एल . कराड यांनी माघार घेतली असून त्यांच्या माघारीची घोषणा सुधाकर बडगुजर विलास शिंदे आणि वसुधा कराड यांनी केली

कोकणी मध्य मतदारसंघातून इच्छुक असताना ते माघारी सारखी पश्चिम मतदारसंघाकडे जात होते मात्र तेथील पत्रकारांनी त्यांना सांगितल्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी व मुस्लिम पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी नाशिक मध्य निवडणूक अधिकाऱ्यांचे कक्षेत जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

डॉ हेमलता पाटील यांनी माघार घेतली तेव्हा शिवसेनेचे वसंत गीते, सुनील बागुल, खासदार  प्रकाश वाजे, काँग्रेसचे गुलजार कोकणी, माजी महापौर विनायक पांडे, राजेंद्र महाले, खासदार डॉ . शोभा बच्छाव, सुभाष शेजवळ, स्वप्निल पाटील, सुफी जीन, शरद आहेर आदि उपस्थित होते .
इतर बातम्या
Join Whatsapp Group