नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन अहिरे समर्थकांनी केले.

आज सकाळी भगूर येथील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन करून भव्य रॅली ला सुरवात झाली. त्यानंतर देवळाली कॅम्प, लॅमरोड विहितगांव येथून वडनेररोड पाथर्डी येथील श्री खंडेराव महाराज मंदिरात अभिषेक करून रॅली चा समारोप करण्यात आला. अनेक वाहने व त्यावर महायुतीचे पदाधिकारी, महिला,कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली मुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करीत असतांना आमदार सरोज आहिरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते देविदास पिंगळे, निवृत्ती आरींगळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, दे कॅम्प भाजप अध्यक्ष जीवन गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष अरुण खांडबहाले, नामदेव गायकर, राष्ट्रवादी देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे,अंकुश भोर, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, मंगेश लांडगे, जिम्मी देशमुख,आदी उपस्थित होते.