नाशिक - भूसंपादनाचा मोबदला देताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण न घेता धन दांडग्यांना प्राधान्य देऊन स्थानिकांना नडणाऱ्यांना आडगावकर त्यांची जागा दाखवतील असा दावा स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी केला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड राहुल ढिकले यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक दोन मधील आडगाव मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. ढिकले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. खासदार शरद पवार यांच्या सभेपुर्वीचं आडगावात ॲड. ढिकले यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने विरोधकांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
आडगावातील मारुती मंदिरापासून रॅली निघाली. त्यापुर्वी गावातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते झाले. यावेळी निमसे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीतही आडगाव मधून ढिकले यांना मताधिक्य मिळाले त्यापेक्षा अधिक मताधिक्य आडगावसह नांदूर-मानूर भागातून देवू.
या प्रचार कार्यालय शुभारंभ आणि प्रचार दौऱ्याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे माजी प्रभाग सभापती शितल माळोदे पुनम सोनवणे सुरेश खेताडे पुंजाभाई माळोदे भिकाजी शिंदे यांच्यासह आडगावचे ग्रामस्थ दामु शिंदे, संतोष भोर, उत्तम मते, युवराज झोमान, रामदास नवले, अभय माळोदे, गणेश माळोदे, सतीश माळोदे, डॉ अशोक भोर, शांताराम गायकवाड, नामदेव शिंदे, माळोदे, कैलास शिंदे, जालिंदर शिंदे, चेअरमन तुकाराम लभडे, प्रभाकर मते, सनी माळोदे, प्रभाकर माळोदे, बाजीराव लभडे, निलेश म्हस्के, निवृती शिंदे, बाजीराव माळोदे, संदीप लभडे भाऊसाहेब शिंदे, कृष्णा राऊत, भाऊसाहेब लभडे, विठ्ठल देशमुख, प्रभाकर भोर, दौलत शिंदे, दत्तू शिंदे, सुरेश मते, सुरेश होडोरे, शिवाजी साठे, मधुकर जाधव, सुनील झोमान, चंद्रशेखर लभडे, राम संधान, सागर माळोदे, उत्तम दिवटे, उत्तम जोंधळे, सागर खांदवे, भाऊसाहेब ढिकले, महेंद्र जाधव, सुभाष कदम, लक्ष्मण म्हस्के, दिनकर कदम, मधुकर कदम, गणेश कदम, राहुल कदम, तानाजी लभडे, शिवाजी म्हस्के, माणिक गाडे, पोपट कदम, भाऊसाहेब मते, दौलत कदम, रामभाऊ कदम, दशरथ कदम, दत्ता शिंदे, सागर मते, मयुर मते आदी उपस्थित होते.
प्रकल्पांसाठी ढिकलेच हवे
भाजप सरकारच्या कार्यकाळात सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा करण्यात आली असून आडगाव पासूनचं महामार्ग जात आहे. दहावा मैल येथे महामार्गाला इंटरचेंज आहे. याच भागात केंद्र सरकारने लॉजिस्टीक पार्कची घोषणा केली आहे. आमदार ढिकले यांच्या कारकीर्दीत महापालिकेने आयटी पार्क मंजुर केला आहे.
त्यामुळे आता प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा ढिकले यांच्याचं नेतृत्वाची आवशक्यता असल्याचे नगरसेविका माजी प्रभाग सभापती शितल माळोदे, पुनम सोनवणे, सुरेश खेताडे, पुंजाभाई माळोदे, भिकाजी शिंदे यांनी सांगितले.