आजकाल सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार असो किंवा कोणतेही काम असो ते अतिशय काळजीपूर्वक करणे खूप गरजेचे ठरते अशीच एक सायबर क्राईम ची घटना म्हाडा येथे घडली आहे. येथे एका इंजिनिअर महिलेला ईडीची भीती घालत त्याची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. 300 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत अभियंता महिलेला सायबर चोरट्यांनी जवळपास तीन लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतीक्षानगर येथील 41 वर्षीय अभियंता महिलेची सायबर भामट्यांनी 8 नोव्हेंबर रोजी फोन करत तुमच्या विरुद्ध ईडी ऑफिस मध्ये तक्रार आल्याचे सांगत 300 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसब आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला म्हाडा(महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण) मुंबई येथील कार्यालयात अभियंता आहे. सायबर चोरट्याने त्यांना संपर्क करून आधी स्वत:चे नाव रवि दहिया सांगितले. तसेच तुमच्या नावावर एक सीमकार्ड घेण्यात आले असून या क्रमांकावरुन अश्लील मेसेज पाठवण्यात आले आहे. त्यामुळे तुमचा कॉल आम्ही आमच्या वरिष्ठांना ट्रान्सफर करत असून हा कॉल दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करण्यात आला. दुसऱ्या व्यक्तीने त्याचे नाव संजय सिंह सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने महिलेला व्हॉट्सअॅप मेसेज करत तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला व्हिडीओ केला.
दरम्यान , व्हिडीओ कॉल केल्यानंतर आम्ही सायबर सेल विभागातून बोलत आहे.आमचे वरिष्ठ अधिकारी गणेश गायतोंडे आता तुमच्याशी बोलतील. त्यानंतर गणेश महिलेवर 300 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत अटक करण्याची धमकी दिली. तसेच तुमच्या आधारकार्ड नंबरवर मनी लॉन्ड्रिंग, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक केली जाईल, असे सांगून भीती घातली. जर तुम्हाला अटकेपासून वाचायचे असेल तर पैसे पाठवा. महिलेने देखील घाबरून तीन लाख रुपये गणेश आणि वजयन या भामट्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.