हिंगोली शहरात नाकाबंदीदरम्यान एका कारमधून एक कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. ही रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढचा तपास सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तगडा पोलिसबंदोबस्त लावून तपासणी सुरू आहे. हिंगोली शहरात याच नका बंदीदरम्यान बस स्थानक परिसरात पोलिसांना एका इनोवा कारमध्ये 1 कोटी 40 लाख रुपयांची रोकड सापडली आहे.
ही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. आचारसंहिता लागू असताना एवढी रोकड कशी आली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार ही रोख बँकेची असल्याच सांगण्यात आलं आहे.