नाशिकसह ''या'' जिल्ह्यांत हुडहुडी, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची हवामान स्थिती
नाशिकसह ''या'' जिल्ह्यांत हुडहुडी, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची हवामान स्थिती
img
दैनिक भ्रमर
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडावा निर्माण झाला असून किमान तापमान हे 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. तर नाशिकमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस एवढं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रमध्ये थंडीचा जोर अधिक असून पुणे आणि नागपूरमध्ये देखील तापमान खालावला आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात कमाल आणि किमान तापमानाची स्थिती कशी असेल.

मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं असेल.पुण्यामधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान केवळ 13 अंश सेल्सिअस एवढं असेल. त्यामुळे पुणेकरांना देखील थंडी अनुभवायला मिळत आहे.

तर विदर्भामध्ये देखील थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून किमान तापमान 14 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. दरम्यान,  पुढील 24 तासांत नागपूरमधील हवामान हे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड असणार आहे. मराठवाड्यातील किमान तापमान देखील सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे थंडीचा जोर देखील चांगलाच वाढला आहे.  मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांत सामान्यतः निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान केवळ 12 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.एकंदरीत राज्यातील बहुतांश शहरांमध्ये गारवा जाणवण्यास सुरुवात झाली असून किमान तापमानात घट झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group