नवरात्रीमध्ये सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी MSRTC कडून ''इतक्या'' गाड्यांचे नियोजन
नवरात्रीमध्ये सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी MSRTC कडून ''इतक्या'' गाड्यांचे नियोजन
img
दैनिक भ्रमर
काल घटस्थापना झाली असून नवरात्री ला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात सप्तशृंगी देवी गडावर दर्शना साठी येतात. दरम्यान  यंदा नवरात्री मध्ये सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातून सुमारे 300 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

घटस्थापना ते दसरा आणि दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत या गाड्या धावतील. त्यामुळे भाविकांना खासगी वाहने गडाच्या पायथ्याशी लावून एसटीनेच गडावर जावे लागेल. नाशिक, मालेगाव, मनमाड, सटाणा, इगतपुरी आणि नांदुरी या ठिकाणाहून सप्तशृंगी गडासाठी या बसेस धावतील.

पहाटे 5 ते रात्री साडेसात या कालावधीत या बसेस वणी गडासाठी धावणार आहेत.  प्रवासी वाहतूक सेवा सुधारित भाडे आकारणीसह 24 तास असणार आहे. यासाठी ठक्कर बाजार, नांदुरी पायथा वाहनतळ, सप्तशृंगी गड वाहनतळ या ठिकाणी वाहतूक केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासोबतच नाशिक ते सप्तशृंगीगड या मार्गावर ई-बसच्या 30 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group