धक्कादायक ! 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार
धक्कादायक ! 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार
img
दैनिक भ्रमर
 राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत आहे. दरम्यान मुंबई च्या वांद्रे परिसरामध्ये एका 18 वर्षीय मुलीचा सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृत्त वेब साइडच्या सूत्रांच्या माहितीनुसार, 'पीडीतेला तिच्या नातेवाईकांकडे घेऊन जाण्यासाठी तिला कार मध्ये बसवले. तिला पाण्याच्या बाटलीमधून काही गुंगीचे पदार्थ देऊन संधीचा फायदा घेतला. हा प्रकरणी निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.यामध्ये एक 31 वर्षीय आरोपी अटकेमध्ये आहे तर दुसरा आरोपी अजूनही फरार आहे.   

दरम्यान, तरूणीने सारा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. तरूणीची त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाली आहे. यामध्ये सामुहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group