बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट ; आत्ताच जाणून घ्या
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट ; आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी ३ संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. एका आरोपीला गुन्हे शाखेने जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. तर अन्य दोघांना नागपूरमध्ये ताब्यात घेतले आहे. सायंकाळपर्यंत या आरोपींना पुण्यात आणले  जाईल अशी चर्चा आहे. 
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवले वाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना ३ संशयित तरुण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांनी मात्र या बाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटने संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. 

नेमकं काय घडलं? 

बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ४ ऑक्टोबरला घडली. पीडित तरुणी आणि मुलगा एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात दुचाकीवरुन फिरायला गेले होते.  त्यावेळी घाटात गप्पा मारत थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून घाटात असलेल्या पठारावर घेऊन गेले. यावेळी तरुणीच्या मित्राला बेल्ट आणि कपड्यांनी बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर मित्रासमोरच तिघांनी तरुणीवर बलात्कार केला आणि तिघे जण पसार झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  .

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group