राज्यात सध्या महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आह. महिला बाहेर, कामाच्या ठिकाणी, शाळेत कुठेही सुरक्षित नाहीत. कधी कोणता व्यक्ती नराधम निघेल याचा नेमच नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलींसाठी तिचा वडीलच नराधम निघाला आह. एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या पित्यानेच बलात्कार केल्याची घटना पुणे येथे घडली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की , पुणे पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी शिकत असलेल्या शाळेच्या प्रशासनाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत वडिलांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली. वारजे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी त्याच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत असे आणि तिच्यावर बलात्कार करत असे. पोलीस उपायुक्त (झोन 3) संभाजी कदम यांनी सांगितले की, आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.