भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपी ताब्यात
भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपी ताब्यात
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्र विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात अखेर पोलिसांनी या प्रकरणात आता मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पवन शर्मा आणि नवनात गुरसाळे असं ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना वाघोली येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या घटनेबाबत ‘एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई प्रगती पथावर आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींबद्दल लवकरच स्पष्ट केले जाणार आहे. तसेच सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 16 पथक रवाना करण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही”, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

तसेच, “ही घटना गंभीर होती. या प्रकरणात प्राधान्यक्रम ठरवून पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस कर्मचारी तपासात व्यस्त आहेत. पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयांकडून 10 पथक आणि क्राईम ब्रांचकडून 6 पथक तयार करण्यात आले होते. हे सर्व पथक या प्रकरणात तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व प्रकारे मग ती टेक्निकल किंवा इतर असतील अशा सर्व अंगांनी तपास केलेला आहे. या तपासात पोलीस प्रगती करत आहेत”, असं सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group