NDCC ची जमीन जप्तीची कारवाई उधळून लावली
NDCC ची जमीन जप्तीची कारवाई उधळून लावली
img
दैनिक भ्रमर
नासिक -  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने त्रंबकेश्वर मधील शेतकऱ्यांच्या जमिनींची जप्तीची कारवाई सुरू होती ही कारवाई कर्जमुक्ती समन्वय समितीने उधळून लावली असून बँकेचे अधिकाऱ्यांना अशी कारवाई करता येणार नाही असे सांगून परत पाठवले आहे. 

नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी म्हणून जप्तीची कारवाई जिल्हाभर सुरू केली आहे या कारवाई विरोधात 562 दिवसापासून कर्जमुक्ती समन्वय समितीच्या वतीने शेतकरी संघटनेचे नेते भगवान बोराडे यांनी आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलनाकडे अजून पर्यंत राज्य सरकारने किंवा जिल्हा बँकेच्या वतीने कोणतेही लक्ष देण्यात आलेले नाही त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे. ही कर्जमुक्ती समन्वय समिती शेतकऱ्यांना मदत करत आहेत अशीच माहिती या समितीचे सदस्य भगवान बोराडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने त्रंबकेश्वर येथे धाव घेतली या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना बोलवून जमीन जप्तीची कारवाई सुरू करण्यात आलेली होती.

यावेळी भगवान बोराडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी इगतपूर्वीचे सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे बँक इन्स्पेक्टर कुरकुटे लहारे सचिव एकनाथ गुंड यांना अशी कारवाई करण्यापासून  रोखले असून नियमाप्रमाणे कारवाई करता येणार नाही शेतकऱ्यांना एकटं बोलून माहिती सांगून त्यांच्या सह्या घेता येणार नाही अशा प्रकारे विरोध करून जिल्हा बँकेने सुरू केलेली त्रंबकेश्वर मधील शेतकऱ्यांच्या जप्तीची कारवाई ही उधळून लावली आहे. कर्जमुक्ती समन्वय समितीने केलेली मदत यामुळे त्र्यंबकेश्वर मधील शेतकऱ्यांनी या समन्वय समितीचे आभार मानले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group