गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका खाजगी शाळेतील शिक्षकाने शाळेतील तीन अल्पवीयन विध्यार्थांचे लैगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंबरनाथ शहरातील पश्चिम भागात असलेल्या एका खाजगी शाळेत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लैगिंक शोषणाचे मोबाइल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलांचे वारंवार लैगिंक शोषण करत असल्याचेही समोर आले.
याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला बेडया ठोकल्या आहेत.
जेम्स जोसेफ शेराव असे अटक नराधम शिक्षकाचं नाव आहे. पीडित मुलांच्या पालकांनी 6 डिसेंबर रोजी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठत मुलांवर घडलेला प्रसंग कथन करताच, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह पोस्को कायदयानुसार गुन्हा दाखल करत नराधमाला काही तासातच अटक केली आहे.
आज नराधम शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.