क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! बाहेर जाताना चिमुरडा टीव्ही बघत होता ,परतली तेव्हा आईला दिसला मृतदेह!
क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! बाहेर जाताना चिमुरडा टीव्ही बघत होता ,परतली तेव्हा आईला दिसला मृतदेह!
img
दैनिक भ्रमर
कधी कधी काही घटना अशा घडतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. होत्याचं नव्हतं व्हायला क्षणही लागत नाही याचा प्रत्यय अशा घटनेमधून येतो. अशीच एक खळबळजनक घटना  हुगळी जिल्ह्याच्या चंदननगर भागात घडला आहे.  6 वर्षांचा चिमुरडा घरामध्ये टीव्हीवर कार्टून बघत होता, तेव्हा त्याची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली. बाहेरून घरी आल्यानंतर  तिच्या समोर पोटच्या बाळाचा मृतदेह पडला होता. मुलाचे  वडील कामावर गेल्यानंतर आई काही कामानिमित्त बाहेर गेली, तर त्यांची मोठी मुलगी परिक्षेसाठी शाळेत गेली. तेव्हा 6 वर्षांचा निखिल एकटाच घरात टीव्हीवर कार्टून बघत होता.

निखिलचे वडील नवकुमार विश्वास कलकत्ता विद्यापीठात पंप ऑपरेटरचं काम करतात. हुगळी जिल्ह्याच्या चंदननगर भागात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. निखिलची आई तनुश्रीदेवी दुपारी घरी परतल्या तेव्हा निखिल दुसऱ्या मजल्यावर झोपलेला त्यांना दिसला. तनुश्रीदेवी यांच्या मोठ्या मुलीने निखिलला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठत नव्हता. तसंच त्याचे हात-पायही थंड पडले होते. घाबरलेल्या कुटुंबाने निखिलला चंदननगर हॉस्पिटलमध्ये नेलं, तिकडे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मुलाच्या शरिरावर बाहेरून कोणत्याही जखमेच्या खुणा डॉक्टरांना आढळल्या नाहीत, त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. निखिलच्या वडिलांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीसही याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

या प्रकरणाची माहिती मिळताच चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी त्यांनी निखिलच्या आई-वडिलांचीही चौकशी केली आहे. पोस्टमॉर्टमनंतरच त्याच्या मृत्यूचं खरं कारण समजेल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान,  मृत्यू झालेल्या निखिलचे वडील नवकुमार यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. आपल्या मुलाची हत्या गळा दाबून करण्यात आली आहे, असा आरोप नवकुमार यांनी केला आहे. कपाटामध्ये मला चावी लटकलेली दिसली, तेव्हा मी पत्नीला विचारलं, पण तिनेही मी कुलूप उघडलं नसल्याचं सांगितलं. कपाटाच्या लॉकरमध्ये 40 हजार रुपये आणि काही दागिने ठेवण्यात आले होते. दरोडा टाकत असताना कुणीतरी माझ्या मुलाची हत्या केली आहे, असा आरोप नवकुमार यांनी केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group