मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना;  लाभार्थी यादी छाननी बाबत काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; लाभार्थी यादी छाननी बाबत काय म्हणाले मुख्यमंत्री ?
img
दैनिक भ्रमर
गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सत्तास्थापनेनंतर बहुचर्चित लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चाना उधाण आले असून   महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, त्यांचे सरकार लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेची छाननी करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या पहिल्या उपाय योजनांपैकी एक म्हणजे लाभार्थ्यांच्या यादीची तपासणी करणे. जे अपात्र आहेत त्यांना बाहेर काढणे. 'लाभार्थी निकषांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची छाननी आवश्यक आहे. योजना पूर्णपणे बदलली जाणार नाही.'असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर ही छाननी केली जाईल.

दरम्यान, छाननीचे महत्त्व सांगताना त्यांनी शेतकरी सन्मान योजनेवेळी झालेल्या मोठ्या गोंधळाचे उदाहरण दिले. 'शेतकरी सन्मान योजनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती. तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत', असे सांगितले होते.त्यानंतर योजना स्थिर झाली'
इतर बातम्या
Join Whatsapp Group