मोठी बातमी ! मुंबईत पुन्हा एका बेस्ट बसनं वयोवृद्धाला चिरडलं
मोठी बातमी ! मुंबईत पुन्हा एका बेस्ट बसनं वयोवृद्धाला चिरडलं
img
दैनिक भ्रमर
मुबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री रात्री 10.45 च्या सुमारास मोठा अपघात झाला. या अपघातात  इलेक्ट्रिक बसने समोर येईल त्याला उडवलं आणि भीषण अपघात घडला  या घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. याच दरम्यान आता असाच एक मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ बेस्टच्या एका बसने एका व्यक्तीला चिरडल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात या इसमाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस झोन एकचे ऑफिसजवळच हा अपघात घडला आहे. दरम्यान या अपघामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या  माहितीनुसार ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई पोलीस झोन एक कार्यालयाजवळ एक अंदाजे 60 वर्षांचे वयोवृद्ध व्यक्तीला आधी एका दुचाकीस्वाराने धडक दिली. परिणामी ते रस्त्यावर पडले आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या चाकाखाली ते आले. याप्रकरणी मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बस कुलाबा बस डेपोकडे जात होती. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुचाकी चालकाचा शोध सध्या सुरू आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्या  दिशेनेही पोलीस आता तपास करत आहे. 

दरम्यान कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 10.45 च्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group