आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा’शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मी अजित आशा अनंतराव पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांची यंदाही उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सहाव्यांदा स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी एक नवा अध्याय रचला आहे. आझाद मैदानात त्यांनी शपथ घेतली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी अजित पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन…’ असे उद्गार संध्याकाळी आझाद मैदानाच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले.