उद्या म्हणजेच, ५ डिसेंबरला ,महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार असून संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ५ शपथ घेतील. दरम्यान, त्याआधी आज महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. मंत्रिमंडळात असणार की नाही या प्रश्नावर एकनाथ शिंदे
यांनी उत्तर दिलं आहे.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे असणार का? असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे आम्ही संध्याकाळी सगळं सांगतो. देवेंद्र फडणवीस हे आमच्या भेटीला आले होते त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मी त्यांचे धन्यवाद देतो. काही वेळात मी तुम्हाला सांगतो. आम्ही एवढे निर्णय घेतले ते ऐतिहासिकच होते. मला खूप आनंद झाला आहे की अडीच वर्षांत महायुतीने खूप चांगलं काम केलं. इतिहासात हे निर्णय सुवर्ण अक्षरांत लिहिली जातील.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर अजित पवार चटकन म्हणाले संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदेंचा निर्णय कळेल. मी तर शपथ घेणार आहे. यावर एकच हशा पिकला. ज्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना दुपारी काय पहाटे शपथ घेण्याचाही अनुभव आहे. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. तसंच कुठलाही गोंधळ गडबड नाही सगळं चित्र स्पष्ट होईल असं देवेंद्र फडणवीस यानंतर म्हणाले.
तसेच, आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची संमती मागितली. राज्यपाल महोदयांनी संमती दिली. संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे. मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून शिफारस केली होती. आज मी शिवसेनेचं समर्थन असलेलं पत्र राज्यपालांना दिला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांनी जो निर्णय घेतला त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीला आजवरच्या इतिहासात कधीही इतकं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. मी आजारी होतो तरीही अनेक बातण्या चालवण्यात आल्या. पण खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.