“मराठ्यांशी बेईमानी केली तर…”  मनोज जरांगेंचा इशारा ! काय म्हणाले वाचा सविस्तर
“मराठ्यांशी बेईमानी केली तर…” मनोज जरांगेंचा इशारा ! काय म्हणाले वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
उद्या ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दरम्यान नवीन सरकार स्थापन होण्याआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. 

मराठ्यांशी बेईमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. मराठ्यांच्या मतांशिवाय कुणी सत्तेत येऊ शकत नाही हे विसरु नका असंही मनोज जरांगेम्हणाले. तसंच शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर त्यांचं पुन्हा काहीतरी लांबलं तर आपल्या शुभेच्छा वाया जायच्या असाही टोला जरांगेंनी  लगावला.

तसेच, “मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, सत्ता आली, भरपूर बहुमत मिळालं म्हणून मराठ्यांशी बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याँव करेन आणि त्याँव करेन असं चालणार नाही. मराठे कुणाच्या बापाला भीत नसतात. मराठा रस्त्यावर उतरला की तुमचं काही खरं नाही. गॅझेट लागू करायचे, मराठा आणि कुणबी एकच आहे. उगाच सत्ता आली म्हणून मस्ती येऊ द्यायची नाही. मराठे कुणाचीही मस्ती टिकू देत नाही तशीच मी पण टिकू देणार नाही.” असं मनोज जरांगे  यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि धरला आहे. उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार नाही. त्यांचं सरकार स्थापन होऊदे त्यानंतर आम्ही तारीख जाहीर करु. सगळ्या पक्षांमध्ये आमचा मराठा समाज आहे. सगळे मिळून आरक्षणाची लढाई लढणार आहोत. सगळ्या आमदारांना मराठे बोलायला लावणारे आहेत. जर नाही बोलले तर मतदान करणारेच त्या आमदाराला जाब विचारतील. सरकार स्थापन होऊ द्या मग उपोषण आंदोलनाची तारीख जाहीर करणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group