येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यात नवीन सरकारचा शपथ विधी पार पडणार आह. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे दरम्यान आता शिंदे सेनेचे खानदेशमधील मोठे नेते गुलाबराव पाटील यांनी बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला.
तसेच, आदित्य ठाकरे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. आंदोलन करून आज आम्ही त्यांना मोठे केलेला आहे. नाहीतर आज ज्यांनी शिवसेनेला मोठे केले ते लोक कुठे आहेत, हे राऊत यांना विचारा असा टोला त्यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, दिवाकर रावते कुठे आहेत, लीलाधर ढाके कुठे आहेत. महाडिकांच नाव कधी घेतलं जातं नाही. या सर्वांना ते विसरले आहेत. त्या महालामध्ये आमच्यासा रख्याची सुद्धा एक वीट आहे. या सर्वांना विसरले म्हणून ते संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले, असा घणाघात त्यांनी ठाकरे यांच्यावर केला. संजय राऊत यांच्या सारख्या दगडाने त्यांच्या महालाचा संपूर्ण सत्यानाश करून टाकला. आता तरी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ओळखावे नाही तर जे उरलेले 20 आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला.