शिंदेंनी मुख्यमंत्रपदाचा दावा सोडल्यानंतर , शिवसेनेतील
शिंदेंनी मुख्यमंत्रपदाचा दावा सोडल्यानंतर , शिवसेनेतील "या" नेत्याची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती सत्ता स्थापनेची. महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता लवकर सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. पण, तीन पक्षाच्या महायुतीमध्ये सध्या कोण मुख्यमंत्री होणार यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अद्यापतरी मुख्यमंत्री कोण होणार यावर काही निर्णय झालेला नाही.  मात्र, या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी अखेर खुलासा केला आहे. कारण राज्यात आताही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा पॅटर्न असणार आहे. त्यामुळे दादा भुसेंच नाव जोरदार चर्चेत आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भुसे यांचं नाव आघाडीवर असल्याची  माहिती आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार नसल्याने भुसे यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दादा भुसे सलग पाचव्यांदाआमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशी दादा भुसे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेत दाद भुसे हेच ज्येष्ठ नेते आहेत.

त्यामुळे उपमुख्यमंत्री पदावर दादा भुसे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळआत सुरु आहे. आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दादा भुसे यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांनी गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि वॉटरबॅग वाटप केले आहेत. गोर-गरीब जनतेसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. तसेच मालेगाव सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व समाजकार्यावर प्रभावित होऊन मालेगाव येथे जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात व नंतर शिवसेनेत सक्रिय झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group