राज्याच्या राजकारणातून एक मोठी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घर वापसीचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना ठाकरे गटात जाण्यापूर्वी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
दरम्यान माजी आमदार डॉक्टर हिरे यांचे अजित पवार यांच्या समवेत चांगला संपर्क असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घर वापसीचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे सिडको सातपूर भागात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.