विधानसभेत महायुतीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. परंतु आद्यपही मुख्यमंत्र्यांचं नाव गुलदस्त्यातचं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणत होते की , 5 तारखेला शपथविधी होणर आहे. मात्र त्यापूर्वी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहे. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आज बैठक रद्द झाली वैगेरे अशा बातम्या येत आहेत. परंतु आज कोणतीही बैठक नव्हती. शिंदे साहेबांची तब्येत ठीक नाहीये, जो काही निर्णय होइल तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान , शपथविधी मैदानाच्या पाहाणीवरून केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी फडणवीसांना मेसेज केला, की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पहाणी करायला एकाच पक्षाचे नेते जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. आम्हालाही कळवलं असत तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो, मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही. जनतेने गैरसमज करु नये. आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत असं केसरकर यांनी म्हटलं आहे.