एकनाथ शिंदेंची कोंडी...नक्की काय म्हणाले बच्चू कडू ? वाचा सविस्तर
एकनाथ शिंदेंची कोंडी...नक्की काय म्हणाले बच्चू कडू ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
येत्या ५ डिसेंबरला राज्यात नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. परंतु अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे कळू शकले नाही. दरम्यान राज्याचे  काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी एक दावा केला आहे. 

भाजपकडून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. बंडखोरी करून भाजपला सत्तेत बसविणाऱ्या एकनाथ शिंदेला भाजप विसरले, असे म्हणत बच्चू कडूंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
 बच्चू कडू म्हणाले, मी शिंदेंना सांगितले होते की तुमचा कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. शिंदे साहेब एकमात्र मुख्यमंत्री होते ज्यांना रात्री दोन वाजता सुद्धा सामान्य माणसांना भेटणारा मुख्यमंत्री मी पाहिला. भाजपला देखील असं वाटले की शिंदेंना दाबून ठेवू पण ते सत्तेत असताना देखील त्यांना दाबू शकले नाही कारण त्यांचे काम बोलत होते. कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता कारण शिंदेंना एकहाती सत्ता हवी आहे.

दरम्यान , बच्चू कडू पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच आज भाजप सत्तेत बसली शिंदेंनी जर बंड केलं नसत तर भाजपला सत्ता कठीण होती. मात्र आता भाजप एकनाथ शिंदे यांना विसरली असून त्यांना आता आकड्याचे गणित दिसत आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group