महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2-1-2 फॉर्म्युला ? वाचा सविस्तर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2-1-2 फॉर्म्युला ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झालाय. राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र विधानसभेच्या 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. आता मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या पक्षाने राज्यात 149 जागा लढवल्या आणि 132 जागा जिंकल्या आहेत.  दरम्यान आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीच्या हायकमांडकडून निश्चित झालंय आणि अधिकृत घोषणा भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवडून होईल. पण असं असलं तरी, शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंचं नावही वारंवार पुढं आणलं जातंय. त्यातच अजित पवारांचीही एंट्री झालीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी 2-1-2 असा फॉर्म्युला पुढं आणला गेल्याची माहिती आहे. 

2-1-2 फॉर्म्युला म्हणजे काय ? 

2-1-2 फॉर्म्युला म्हणजे सुरुवातीचे 2 वर्षे भाजप अर्थात फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. नंतर एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद अजित पवारांनी मागितल्याचं कळतंय. कारण आपल्याला संधी कधी मिळेल असं अजित पवारांचं म्हणणं असल्याचं समजतंय आणि 3 वर्षे संपल्यानंतर शेवटचे 2 वर्षे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं, असा फॉर्म्युला चर्चेला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group