महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीतून पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावर सस्पेन्स आहे.
दरम्यान , महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जागा पाहून फडणवीस यांच्य गोटातून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही देवेंद्र फडणवस यांचे नाव पुढे केले जात आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास सहजासहजी मान्य होतीलं असेही वाटत नाही. शिंदे गटाकडूनही मुख्यमंत्रपदाची आग्रही मागणी होऊ लागली आहे.
निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरच्या दोन्ही संकेतांवरून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीला 220+ जागा मिळाल्या आहेत. तर एकट्या भाजपने 125 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार हे निश्चित मानले जात आहे. पण एकनाथ शिंदे सहज सहमत होतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणज् भाजपमध्ये फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी जोर धरू लागली आहे. खुद्द आरएसएसकडूनही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी होताना दिसत आहे. याशिवाय अमित शहा यांनीही नुकत्याच झालेल्या निवडणूक सभेत केलेल्या वक्तव्यातून याचे संकेत दिले होते.
अशा स्थितीत भाजपकडेही प्लॅन बी आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पद घेऊन डिमोशन स्वीकारणार नाहीत. तोच फडणवीसांनाही आता मंत्रिमंडळात इतर हलकी पद घेण्याची इच्छा नाही. असा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्त्वाकडून देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते किंवा एकनाथ शिंदेदेखील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.