युट्युब वर या अनेकदा वेगवगेळे व्हिडिओ बघायला मिळत असतात अनेक लोकसोशल मीडियावर व्हायरल होण्याकरता अनेक गोष्टी करत असतात अशाच असंच काही एका यूट्यूबरने केलंय,एका यूट्यूबरने तिच्या पॉडकास्टमध्ये एक धक्कादायक खुलासा केला. ज्यात तिने सांगितले की ती तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कार केलेल्या चितेच्या राखेपासून सिगारेट बनवते आणि धूम्रपान करते.
दरम्यान, हे विधान बऱ्याच लोकांसाठी किळसवाणं होतं, कारण आपल्या वडिलांच्या राखेचा अशा पद्धतीने वापर कुणी करण्याचा विचार देखील करणार नाही. पण या यूट्यूबरने असं का केलं यामागंच कारण तिने पुढे सांगितलं, ते देखील अनेकांसाठी न पटण्यासारखंच आहे. तिने सांगितलं की तिने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे पाऊल उचललं. तिने सांगितले की तिचे वडील तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे होते आणि त्यांच्या निधनानंतर ती खूप दुःखी होती. हा त्रास कमी करण्यासाठी तिने ही विचित्र पद्धत अवलंबली.
तिने सिगारेटमध्ये राख टाकली आणि धूम्रपान केले आणि ही गोष्ट तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसह देखील शेअर केली. या प्रसिद्ध YouTuber चं नाव Rosanna Pansino आहे आणि अलीकडेच तिने तिच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने हे देखील सांगितले की तिने आपल्या वडिलांच्या राखेतून गांजाचे रोप वाढवले आणि नंतर ते सिगारेटमध्ये भरले आणि आता ती त्यापासून रोज धूम्रपान करते. वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे असं देखील ती म्हणाली.
या घटनेचा व्हिडिओ रोझना पानसिनोने तिच्या अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे, हा व्हिडिओ आतापर्यंत २५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांना तिचं हे पाऊल आवडलं देखील. परंतु तरीही अजूनही असा वर्ग आहे, ज्याने या यूट्यूबरला ट्रोल केलं आहे आणि तिच्या अशा वागण्याची निंदा देखील केली.
Rosanna Pansino अलीकडेच तिचे पहिले पॉडकास्ट “Rodiculous” लाँच केले आहे आणि त्याच्या पहिल्या भागाचे शीर्षक आहे “Smoking My Dead Dad”. असं आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की तिने हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं आहे.