विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. याच यादरम्यान महायुती आणि महाविकासाआघाडी मध्ये जोरदार जुंपल्याची पाहायला मिळतेय. दोनीही पक्षांचे नेते विविध मुद्यांवरून एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान व्होट जिहाद मुद्द्यांवरून ही राजकारण तापले आहे. पुण्यातील खडकवासलामध्ये झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला .
‘जर इथं व्होट जिहाद होणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध इथं आपल्याला लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ राहू, एक आहो तर सेफ आहोत, मी तुम्हाला विनंती करतोय’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सभेतून आवाहन केलं आहे. या सभेत फडणवीस यांनी मविआला मतदान करा, असं आवाहन करणारा सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओच ऐकवला होता.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एका मौलानाचा व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यानंतर पुण्यातील खडकवासलामध्ये झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सज्जाद नोमानी मौलानाचा व्हिडीओ ऐकवला आहे. त्यानंतर त्यांना मतदारांना आवाहन केलं.
तसेच, ‘व्होट जिहादचा नारा दिला आहे. व्होट जिहादचे सिपे सालार कोण आहे, ते तुम्ही ऐकलं आहे. व्होट जिहादासाठी ते उलेमा यांचे तळवे चाटत आहे. जर इथं व्होट जिहाद होणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध इथं आपल्याला लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ राहू, एक आहो तर सेफ आहोत, मी तुम्हाला विनंती करतोय, यांचे इरादे फक्त महाराष्ट्र नाही तर दिल्ली हलवण्याचे आहे. हा देशाला अस्थिर करण्याचा डाव आहे. यामध्ये महाविकास आघाडी सामील आहे. त्यामुळे सेफ आहो तर एक आहो, असा नारा फडणवीसांना पुन्हा एकदा दिला.