''त्या'' प्रकरणामुळे अजित पवार यांना  कोर्टात हजर राहण्याचे समन्स, वाचा सविस्तर
''त्या'' प्रकरणामुळे अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सर्वांचे लक्ष २३ नोव्हेंबर  लागणाऱ्या निकालावर आहे. दरम्यान अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीच्या मतदार संघातील हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group