बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणुकीचे आज मतदान पार पडले आह .दरम्यान,अशात साताऱ्यात एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान करताना मतदानकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावतानाच मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शाम धायगुडे असे मतदानकर्त्याचे नाव आहे. धायगुडे 67 वर्षाचे होते . मतदान करतानाच अचानक चक्कर आल्याने जागेवरच कोसळले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.