राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये चिंतेच वातावरण आहे. बॉलिवूड सुपर स्टार सलमान खानला धमक्या मिळत आहेत. तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमान खानला वारंवार धमक्या मिळत असून अशातच आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानला सुद्धा धमकी मिळाली आहे. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनवरुन शाहरुखला ही धमकी मिळाली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शाहरुखच्या धमकी प्रकरणात छत्तीसगड रायपूर कनेक्शन आढळून आलं आहे. तिथे राहणाऱ्या फैझान नावाच्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला होता. मुंबई पोलिसांची टीम चौकशी करण्यासाठी रायपूरला गेली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहरुख खानच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था आहे.