गुजरात राज्यातील सुरत येथील 41 वर्षीय व्यक्ती मुंबईतील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीसोबत एक 14 वर्षांची अल्पवयीन मुलगीही होती. ही धक्कादायक घटना मुंबईतील ग्रँट रोड येथे शनिवारी घडली आहे.
मृत इसम 41 वर्षांचा होता. तो एका डायमंड फॅक्टरीचा मॅनेजर होता. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याचाविरोधात POCSO कायद्याअंतर्गत अत्याचार आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत इसम हा त्या पीडित मुलीला गुजरातमधून घेऊन आला होता. मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी त्यालाा तातडीने रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तेथे काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान याविषयी अधिक माहिती अशी कि, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीची आई मुंबईत आली. मृत इसम त्या मुलीला फूस लावून, खोटे आश्वासन देऊन मुंबईला घेऊन आला होता, असे तिच्या आईने सांगितले, अशी माहिती डीबी मार्ग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.