मोठी बातमी !  भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची भर रस्त्यात हत्या,  कुऱ्हाडीने वार करून संपवलं
मोठी बातमी ! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची भर रस्त्यात हत्या, कुऱ्हाडीने वार करून संपवलं
img
दैनिक भ्रमर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख तर सध्याचे भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली होती. प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. मीरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

सुधाकर खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती. खाडे यांनी 2014 साली  तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. 

दरम्यान , या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडेयांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group