नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या विविध मतदार संघातून चौघांनी माघार घेतली असून, स्वराज्य पक्षाचे उमेदवार करण गायकर यांनी नाशिक पश्चिममधून माघार घेतली मात्र नाशिक पूर्वमधून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. नाशिक मध्य मधून मनसेचे अंकुश पवार यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार माघार घेतली आहे.
नाशिक पश्चिम मधून अपक्ष उमेदवार दिलीप भामरे व बंडखोर शशी जाधव यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतली आहे. यावेळी महायुतीच्या उमेदवार सिमा हिरे व भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव उपस्थित होते. यामुळे सिमा हिरे यांना मदत होणार आहे.
स्वराज्य पक्षाचे उमेदवार करण गायकर यांनी नाशिक पश्चिम मधून उमेदवारी अर्ज माघारी घेतला असून नाशिक पूर्व मतदार संघातून मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
नाशिक पूर्व मधून भाऊसाहेब निमसे (अपक्ष) यांची माघार घेतली असून, नाशिक मध्य मधून अंकुश पवार (मनसे) यांनी माघार घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक सलीम मामा शेख उपस्थित होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने माघार घेतल्याचे सांगत निवडणूक लढवून विजयी झालो असतो आणि राज ठाकरे यांनी सांगितले असते तर आमदारकीचाही राजीनामा दिला असता, असेही अकुंश पवार यांनी सांगितले.