भाजपला सोडचिट्ठी देत तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी
भाजपला सोडचिट्ठी देत तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी
img
दैनिक भ्रमर

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या असून राजकारणातील हालचालींना वेग आला असून, शरद पावले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. दरम्यान काही दिवसांआधीच  इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  त्यानंतर आता लगेचच त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.  हर्षवर्धन पाटील यांची  पार्लमेंटरी बोर्डवर नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी नव्या लढाईचे रणशिंग फुंकले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डवर हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळात आले आहेत. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी परिवर्तन मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला उत्सफूर्द प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्यातून बोलताना हर्षवर्धन पाटलांविरोधात अपक्ष निवडणूक लढण्याची भाषा केली गेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group