राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर पुण्यातील आणखी एक नेता लॉरेन्स बिश्नोई टोळी च्या रडारवर होता, असा धक्कादायक खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे . बाबा सिद्दिकींवरचा हल्ला फेल झाला असता तर बिष्णोई गँगने प्लान बीदेखील तयार केला होता. बिष्णोई गँग पुण्यातल्या एका राजकीय नेत्याच्या हत्येचा कट करत होती, अशी धक्कादायक माहिती मुंबई क्राईम ब्रांचने दिली आहे.
‘लॉरेन्स बिष्णोई गँग पुण्याच्या एका नेत्याची हत्या करण्याचा प्लान करत होती. याची जबाबदारी प्लान बीमध्ये सामील असलेल्या शुटरना देण्यात आली होती’, असं क्राईम ब्रांचच्या सीनियर अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
मुंबई क्राईम ब्रांचने बाबा सिद्दिकींच्या हत्येमध्ये वापरली गेलेली पिस्तुल जप्त केली, यानंतर लॉरेन्स बिष्णोई गँगच्या प्लान बीचा खुलासा झाला आहे. क्राईम ब्रांचने पुण्याच्या नेत्याचं नाव जाहीर केलेलं नाही, पण पुणे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी गौरव विलास अपुनेला अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. गौरव विलास बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला संशयीत शुटर आहे. अपुने गँगच्या प्लान बी चा भाग होता. जर सिद्दिकींवरचा हल्ला यशस्वी झाला नसता तर त्याने प्लान बी ची अंमलबजावणी केली असती.