महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक
महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक
img
दैनिक भ्रमर
 ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली आहे. हॅकर्सकडून अनेकांना आतापर्यंत गंडा घालण्यात आला आहे. फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत आहे. आतापर्यंत अनेक सर्वसामान्य किंवा सेलेब्रेटिंचे तसेच राजकीय नेत्यांचे  ही फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. 

 मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. अज्ञात हॅकर्सनी आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले असून त्यावरुन काही आक्षेपार्ह पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: आदिती तटकरे यांनी दिलआदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 

“नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group