Nashik Crime News : जादा नफ्याच्या मोहाने चार जणांनी गमावले 71 लाख रुपये
Nashik Crime News : जादा नफ्याच्या मोहाने चार जणांनी गमावले 71 लाख रुपये
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केट ट्रेडिंग टास्कच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जणांची 71 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी यांना दोन वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून मेसेज करणार्‍या व्यक्तींनी शेअर मार्केट ट्रेडिंग टास्कच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर एका अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास लावून आरईएक्स नावाच्या अ‍ॅपमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग करण्याचे भासवून ट्रेडिंगकरिता विविध बँक खात्यांवर एकूण 28 लाख 80 हजार 70 रुपये भरण्यास लावून फिर्यादी यांना पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

फिर्यादीप्रमाणेच शेअर मार्केट ट्रेडिंग टास्कच्या नावाखाली फिर्यादी व इतर तीन साथीदार या सर्वांची मिळून 71 लाख 111 रुपयांची फसवणूक करणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकधारक व फसवणुकीची रक्कम वर्ग झालेले बँक, वॉलेट खाते व फसवणुकीकरिता वापरण्यात आलेल्या मोबाईलधारकांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार दि. 9 जुलै ते 8 सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group